सेंट विन्सेंट : अफगाणिस्ताननं बांगलादेशला (AFG vs BAN) अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं. राशिद खानच्या (Rashid Khan) नेतृत्त्वातील संघानं विजय मिळवल्यानं त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुपर 8 च्या ग्रुप 1 मधून भारत (Team India) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) उपांत्य फेरीत गेले आहेत. तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर गेली आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 115 धावा केल्या होत्या. राशिद खाननं अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केल्यानं अफगाणिस्ताननं 115 धावा केल्या. याच ओव्हरमध्ये राशिद खान स्वत:वरील नियंत्रण गमावून बसल्याचं पाहायला मिळालं. राशिद खाननं दुसरी रन न घेणाऱ्या करीम जनतच्या दिशेनं  बॅट फेकून दिली.  


अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खानचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं. राशिद खाननं दुसरी रन घेण्याच्या मुद्यावरुन थेट करीम जनतच्या दिशेन बॅट फेकून दिली. अफगाणिस्तानच्या डावाच्या 20 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. राशिद खान त्यावेळी फलंदाजी करत होता. अफगाणिस्तानच्या 5 विकेटवर 107 धावा झाल्या होत्या. त्यावेळी राशिद खान आणि करीम जनत यांच्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. राशिद खाननं थेट त्याच्या दिशेनं बॅट फेकून दिली.  


राशिद खान आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. राशिदला तंझिम सकीबला हेलिकॉप्टर शॉट मारायचा होता. पण तो बॉल त्यावेळी बाऊंड्रीच्या बाहेर न जाता कव्हर्सच्या दिशेनं गेला. यावेळी बांगलादेशच्या श्रेत्ररक्षकांवर दबाव आणण्यासाटी राशिद खानला दुसरी धाव घ्यायची होती. मात्र, करीम जनत यानं एक रन घेतल्यानंतर दुसऱ्या रनला नकार दिला.  यामुळं नाराज झालेल्या राशिद खाननं बॅट करीम जनतच्या दिशेनं फेकून दिली. 


राशिद खानकडून घडलेल्या चुकीनंतर देखील करीम जनतनं बॅट उचलली त्याच्याकडे नेऊन दिली. करीम जनतनं राशिद खान सोबत चर्चा करुन वाद संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राशिद खानचा राग काही केल्या कमी झाला नव्हता. 


पाहा व्हिडीओ :







लिटन दासची एकाकी झुंज


अफगाणिस्तानं 20 ओव्हरमध्ये 5 बाद 115 धावांची खेळी केली होती. पावसामुळं सामन्यात वारंवार व्यत्यय येत होता. बांगलादेशच्या फलंदाजांचा राशिद खान आणि नवीन उल हक समोर टिकाव लागला नाही. अफगाणिस्ताननं बांगलादेशला 18 व्या षटकांत 105 धावांत रोखलं. लिटन दास 54 धावा करुन नाबाद राहिला. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह अफगाणिस्ताननं भारतापाठोपाठ पहिल्या गटातून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान सुपर एट साखळीतच संपुष्टात आलं.


संबंधित बातम्या :


T20 World Cup 2024: 10 वाजता मैदानातच लोळत पडला, चालताही येईना, 10.30 वाजता पळ पळ पळाला, गुलबदीन नईबच्या ॲक्टिंगने 'ऑस्कर'लाही लाजवलं!


T20 World Cup 2024 AFG vs BAN: एका दगडात दोन शिकार, इकडे बांगलादेशला हरवलं, तिकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर ढकललं, अफगाणिस्तानने इतिहास रचला!