मेलबर्न : बॉल टॅम्परिंग प्रकरणाचे गंभीर परिणाम क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भोगावे लागत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा टॉप स्पॉन्सर मॅगलनने आपला करार संपुष्टात आणला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत असलेला करार मॅगलनने स्वत: मोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅगलनचे मुख्य कार्यकार अधिकारी हामिश डगलसने या बातमीला दुजोरा दिला आहे. 'खेळाविषयी असणारी प्रतिष्ठा, अखंडता, उत्कृष्ट नेतृत्व, समर्पण यावर आमची भागीदारी आधारित होती. पण ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी जिंकण्यासाठी नियम तोडले. जे कधीही मान्य करता येणार नाही.'
या संपूर्ण प्रकरणी चौकशी करण्यात आली असून तीन खेळाडू दोषी आढळले आहेत. त्यानंतर मॅगलनने हा निर्णय घेतला.
100 कोटीचा करार मोडला
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मॅगलनने क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलियन 20 मिलियन डॉलर (100 कोटी रुपये) तीन वर्षाचा करार केला होता. पण आता बॉल टॅम्परिंगनंतर कंपनीने हा करार मोडला आहे. ज्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं बरंच नुकसान झालं आहे.
ASICSनेही वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्टसोबतचे करार मोडले
खेळाचं साहित्य तयार करणाऱ्या ASICS कंपनीने देखील बॉल टेम्परिंग वादाबाबत डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्टसोबतचा करार संपुष्टात आणला आहे.
संबंधित बातम्या :
वॉर्नर कधीही कर्णधार होणार नाही, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय
स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच : सचिन तेंडुलकर
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी
समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड!
VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील
व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल
स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!
'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं
क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना
स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
बॉल टॅम्परिंगमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मॅगलनने करार मोडला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2018 02:37 PM (IST)
बॉल टॅम्परिंग प्रकरणाचे गंभीर परिणाम क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भोगावे लागत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा टॉप स्पॉन्सर मॅगलनने आपला करार संपुष्टात आणला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -