Commonwealth Games 2026 Boxing Video Goes Viral : ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 (Commonwealth Games 2026) मधून एक धडकी भरवणारी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये वेल्सचा बॉक्सर ऑर्लँडो हॉली-सोटोमी (Orlando Holley-Sotomi) याने असा काही जोरदार ठोसा मारला, ज्यामुळे प्रतिस्पर्धी बॉक्सर रिंगमध्ये जागीच पडल.
पुरुषांच्या 70 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व (Quarterfinal) सामन्यात वेल्सच्या ऑर्लँडो हॉली-सोटोमीचा सामना लेसोथोच्या रेफिलो थाई (Refiloe Thai) याच्याशी झाला. सामन्याला सुरुवात होऊन अवघा एक मिनिट झाला असतानाच, हॉली-सोटोमीने अत्यंत आक्रमक चाल खेळत एक जबरदस्त राईट हँड पंच थेट रेफिलोच्या हनुवटीवर मारला. हा पंच इतका जोरदार होता की रेफिलो थाई चारी मुंड्या चित होत रिंगमध्ये खाली कोसळला आणि काही वेळ तसाच पडून राहिला.
सामन्याचा थरार आणि धक्कादायक क्षण
सामन्याची सुरुवात दोन्ही बॉक्सर्सनी अत्यंत आक्रमक पद्धतीने केली होती. दोघेही एकमेकांवर जोरदार वार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, हॉली-सोटोमीच्या सुरुवातीच्या एक-दोन पंचेसचा मारा बसल्यानंतर रेफिलो थाई बचावात्मक (Defense Mode) भूमिकेत गेला. याचाच फायदा घेत हॉली-सोटोमीने रिंगमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आणि केवळ एका मिनिटाच्या आतच सामना आपल्या बाजूने फिरवला.
पंच बसल्यानंतर रेफिलो थाईची अवस्था अशी झाली होती की, त्याला काही क्षण काय घडले हेच समजले नाही. रिंगमधील वैद्यकीय पथकाने तात्काळ धाव घेत परिस्थिती हाताळली. सुदैवाने, रेफिलो थाई पूर्णपणे बेशुद्ध झाला नव्हता. परंतु, हॉली-सोटोमीच्या त्या एकाच पंचचा परिणाम पाहून पंचांनी तात्काळ तो सामना तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला.
पदक केले पक्के
आपल्या पहिल्याच कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झालेल्या वेल्सच्या ऑर्लँडो हॉली-सोटोमीने या विजयासह थेट उपांत्य फेरीत (Semifinal) धडक मारली आहे. उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे त्याने वेल्ससाठी बॉक्सिंगमधील कांस्य पदक (Bronze Medal) निश्चित केले आहे.
हे ही वाचा -
