Commonwealth Games 2022: भारताचा दिग्गज खेळाडू सौरव घोषालनं स्क्वॉशमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्यानं इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपचा 3-0 असा पराभव केलाय. पहिला सेट सौरवनं 11-6 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जेम्स विल्स्ट्रॉपला 11-1 असं पराभूत करून सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही आक्रमक खेळी दाखवत त्यानं एकतर्फी सामना जिकंला. भारताच्या पदकांची संख्या आता 15 झालीय. ज्यामध्ये 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे.
कॉमनवेल्थमध्ये स्क्वॉशच्या एकेरी स्पर्धेत भारताचं पहिलं पदक
कॉमनवेल्थमध्ये स्क्वॉशच्या एकेरीत भारतानं पहिल्यांदाच पदक जिंकलं आहे. सौरव घोषालसमोर इंग्लंडच्या जेम्स विलस्ट्रॉफचं मोठं आव्हान होतं. कारण याआधी जेम्स विलस्ट्रॉफविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात सौरव घोषाल काही खास कामगिरी करता आली नाही. सौरव घोषणा आणि विलस्ट्रॉफ आतापर्यंत आठ वेळा आमने- सामने आले. त्यापैकी सौरवला सात सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मात्र, आजच्या सामन्यात सौरवनं दमदार प्रदर्शन करत विलस्ट्रॉफचा 11-6, 8-1 आणि 11-1 असा पराभव केलाय.
ट्वीट-
सौरव घोषालचं क्रिकेटशी खास नात
भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि सौरव हे नात्यानं साडू आहेत. कार्तिकची पत्नी दिपीका पल्लिकलची बहिणीसोबत सौरवनं 2017 मध्ये लग्न केलंय.
कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 5 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ.)
कांस्यपदक- 4 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल)
हे देखील वाचा-