सिडनी : वेटलिफ्टर्सपाठोपाठ भारतीय नेमबाजांनीही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. नेमबाज श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. तर पुरुषांच्या डबल ट्रॅपमध्ये अंकुर मित्तलने कांस्यपदकाची कमाई केली.

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 24 वर पोहचली आहे.

त्याआधी, नेमबाज ओम मिथरवाल याने 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. ओम मिथरवालने अंतिम फेरीत 201.1 गुणांची नोंद केली.

ओमचं यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतलं हे दुसरं कांस्यपदक आहे. ओमने सोमवारीही पुरुषांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकच मिळवलं होतं.



राजस्थानातील माधोपूरचा रहिवासी असलेला ओम मिथरवाल अवघ्या 23 वर्षांचा आहे. चारच वर्षांपूर्वी ओम सैन्यात दाखल झाला होता. सध्या तो इंदूरजवळ महुआ गावात हवालदार पदावर आहे. वर्षभरापूर्वीच ओमचं लग्न अंजूसोबत झालं. त्याची पत्नी सध्या द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत आहे.

ओमने यापूर्वी मेक्सिकोतील नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदक पटकावलं आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकाच वेळी दोन पदकं जिंकल्यामुळे ओमला दुहेरी आनंद झाला आहे.

महाराष्ट्राची सूनबाई हीना सिद्धूनेही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदकं मिळवण्याचा मान पटकावला. हीनाने सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे.

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 24 पदकांची कमाई केली आहे. भारताने 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्य पदकांची कमाई केली आहे.

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी

नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य

नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य

नेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण

बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण

टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य


नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य

टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण

नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य

नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य


वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य

वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य

गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी

भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.

2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकांची लयलूट भारताने केली आहे

संबंधित बातम्या :
CWG 2018 : हीना सिद्धूला सुवर्ण, यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदक

CWG 2018: भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक

CWG 2018 : महिला-पुरुष नेमबाजीत एकाच दिवशी 4 पदकं

CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’

CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य

CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण

CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण

CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक

CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण

CWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण

GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी