मुंबई: वेस्टइंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं त्याच्या निवृत्तीबाबत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. 2019 च्या विश्वचषकापर्यंत आपली खेळण्याची इच्छा असल्याचं गेलनं म्हटलं आहे.


वेस्टइंडिजसाठी कसोटी, वनडे आणि टी20 सामने खेळणारा गेल म्हणाला की, 'कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी मी बिग बॅश लीग खेळत नाही. तसेच मला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळही हवा आहे. जर मी फिट आणि फॉर्मात असलो तर वेस्टइंडिजच्या टी20 आणि वनडे संघात जागा बनविण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.'

गेलनं 100हून अधिक कसोटीत 7000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 15 शतकं आणि 37 अर्धशतकं त्यानी ठोकली आहेत. तर 269 वनडे सामन्यात त्याने 9000 पेक्षा अधिक धावा केल्या असून 22 शतक आणि 47 अर्धशतकं ठोकली आहेत.