लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. लंडनमध्ये गुरुवारी झालेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 असं पराभूत केलं. मात्र ब्रिटन विरुद्ध बेल्जियमसामना बरोबरीत सुटल्याने भारताचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित झालं आहे.


 

 

आता अंतिम फेरीत भारताचा सामना पुन्हा ऑस्ट्रेलियासोबतच होणार आहे.

 

 

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने कधीही प्रवेश केला नव्हता. 1982 साली नेदरलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ब्राँझ मेडल पटकावलं होतं. ही भारताची या स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी.

 

 

दरम्यान काल झालेल्या सामन्यात व्ही.आर.रघुनाथ आणि मनदीप सिंह यांच्या गोलमुळे भारताने कांगारुंना चांगली टक्कर दिली. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताच्या शिलेदारांनी दमदार कामगिरी करुन सुवर्णपदक मिळवावं, अशी अपेक्षा तमाम हॉकीप्रेमींची आहे.