लंडन: सरफराज अहमदच्या पाकिस्ताननं टीम इंडियाचा 180 धावांनी धुव्वा उडवून पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यावर पाकिस्ताननं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं.

त्या लक्ष्याच्या दडपणाखाली टीम इंडियाचा अख्खा डाव अवघ्या 158 धावांत गडगडला.  भारताकडून हार्दिक पंड्यानं 76 धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. टीम इंडियाच्या अन्य दहा फलंदाजांनी मिळून केवळ 79 धावाच जमवल्या. 

पाकिस्तानी संघावर शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान, पाकिस्तानच्या या जबरदस्त विजयानंतर त्यांच्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग म्हणतो, "आजच्या जबरदस्त विजयाबद्दल पाकिस्तानचं अभिनंदन. चांगला खेळ केल्याने ते विजयाचे दावेदार होते. पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी हा विजय महत्त्वाचा आहे.

https://twitter.com/virendersehwag/status/876469647096205312

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणतो, "ही कामगिरी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील चाहते कायमचे लक्षात ठेवतील. पाकिस्तानने ही चॅम्पियन्स ट्रॉफी संस्मरणीय केली"

https://twitter.com/SAfridiOfficial/status/876464972875710465

इम्रान खान

1992 मध्ये पाकिस्तानला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान म्हणाले, "चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचं अभिनंदन. फखर झमानसारखा खेळाडू पाहाणं जबरदस्त होतं."

https://twitter.com/ImranKhanPTI/status/876468275336462337

वसीम आक्रम

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम आक्रम म्हणतो, "शानदार! टीम ग्रीनचा विजय अविश्वसनीय आहे.  1992 चा वर्ल्डकप जिंकल्याची प्रचिती होत आहे. आनंद गगनात मावेनासा झालाय"

https://twitter.com/wasimakramlive/status/876476660610105344

कुमार संगकारा

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा म्हणाला, "पाकिस्तानी संघ हिम्मत आणि विश्वासाने खेळले. त्यांनी अविश्वसनीय खेळ केला.

https://twitter.com/KumarSanga2/status/876466500294631424