South Africa vs Australia Champions Trophy Match: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सातवा सामना रद्दा झाला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार होता. मात्र रावळपिंडी येथील जोराच्या पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला आहे. विशेष म्हणजे रावळपिंडी येथील हवामान एवढे खराब होते की या सामन्यासाठी नाणेफेकही होऊ शकली नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना द्द झाल्यानंतर ग्रुब-बी मधील समीकरण चांगलेच बदलले आहे. हा सामना रद्द झाल्यानंतर आता पुढे काय होणार? कोण उपांत्य फेरीत धडक मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उपांत्य फेरीत जाण्याचे समीकरण बदलले
दक्षिण आफ्रिकाबाबत बोलायचे झाल्यास या संघाने आपल्या आधीच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला 107 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियासोबतचा सामना रद्द झाल्यानंतर या संघाच्या खात्यात एकूण तीन अंक झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघासाठी उपांत्य फेरीत जाण्याचे समीकरण बदलले आहे.
दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत कसा पोहोचू शकतो?
वर उल्लेख केल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका बी ग्रुपमध्ये आहे. या संघाच्या नावावर तीन अंक आहेत. ऑस्ट्रेलिया संघालाही तीन अंक मिळालेले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे रन-रेट कमी आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक सामना बाकी आहे. हा सामना 1 मार्च रोजी इंग्लंड या संघाविरोधात होणार आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाल्यास तो थेट उपांत्य फेरीत धडक मारेल.
तर दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवीत होणार
दुसरीकडे दक्षिण आफ्रिका इंग्लंड संघासोबतच्या सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे अंक फक्त तीन राहतील. अशा स्थितीत अफगाणिस्तान या संघाने इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच्या कोणत्याही एका सामन्यात विजय मिळवल्यास दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवीत होतील. इंग्लंडला चार अंक मिळाले आणि अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचे गुण समान होतील. असे झाले तर सर्वाधिक रन रेट असणारा संघ उपांत्य फेरीत जाईल.
ग्रुप-बी पॉइंट टेबल
ग्रुप-बी मध्ये एकूण चार संघ आहेत. यातील दक्षिण आफ्रिका संघ 3 अंक मिळवून सर्वोच्च स्थानावर आहे. या संघाचे रन रेट +2.140 आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया हा संघ आहे. या संघाच्याही खात्यावर तीन अंक आहेत. या संघाचा रन रेट +0.475 आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ गुणतालिकेत खातं खोलू शकलेले नाहीत. इंग्लंडचा रन रेट -0.475 आहे. तर अफगाणिस्तानचा रन रेट -2.140 आहे.
हेही वाचा :