मुंबई : ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नला टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलसोबत पैज लावणं महागात पडलं आहे. कारण शेन वॉर्न सौरव गांगुलीसोबत पैज हरला.


पैजन हरल्यामुळे शेन वॉर्नला आता इंग्लंडच्या संघाची जर्सी घालावी लागणार आहे. विशेष म्हणजे वॉर्न त्यासाठी तयार आहे. स्वत: शेन वॉर्नने ट्विटरवर याची माहिती दिली.

https://twitter.com/ShaneWarne/status/873822553030217728

https://twitter.com/ShaneWarne/status/874164637528457217

'आज तक' चॅनलच्या एका कार्यक्रमात या दोन दिग्गजांमध्ये पैज लागली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवलं तर गांगुलीला एक दिवसासाठी ऑस्ट्रेलियन संघाची जर्सी घालावी लागेल आणि इंग्लंडचा विजय झाल्यास मी इंग्लंडच्या संघाची जर्सी घालेन, असं शेन वॉर्न म्हणाला होता. यानंतर गांगुलीनेही त्याचं आव्हान स्वीकारलं.

'करो या मरो'च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या मोबदल्यात 277 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने 40.2 षटकात 4 विकेट्स गमावून 240 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, एवढ्यात षटकात इंग्लंडची धावसंख्या 4 विकेट्सवर 200 धावा हवी होती. मात्र इंग्लंडच्या संघाने 40 धावा अधिक केल्या. अशाप्रकारे इंग्लंडला 40 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.

इंग्लंडच्या विजयामुळे शेन वॉर्न गांगुलीकडून पैज हरला. त्यामुळे आता त्याला एका दिवसासाठी इंग्लंडची जर्सी घालावी लागणार आहे.