रिओ ऑलिम्पिक: संशयास्पद वस्तूचा पोलिसांनीच नियंत्रित स्फोट घडवला
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2016 05:16 PM (IST)
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकच्या सायकल ट्रॅकजवळ स्फोटाचा आवाज ऐकू प्राथमिक माहिती हाती येते आहे. मात्र, या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, घटनास्थळी बॉम्ब पथक तसंच पोलिसही उपस्थित आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेदरम्यान असा प्रकार घडल्यानं आता रिओ ऑलिम्पिकच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.