बर्थ डे स्पेशलः सुनिल गावस्कर यांचे 10 विचार
''माझ्या मते, सर गार्फील्ड सोबर्स यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्षे खेळणारा कोणताही खेळाडू नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 20 वर्ष देणं ही खूप मोठी गोष्ट आहे.''
''चांगला खेळाडू बनण्यासाठी बुद्धी लागते, तर महान खेळाडू बनण्यासाठी विराट कोहलीसारखा अॅटीट्यूड लागतो.''
''सईद अजमल शिवाय पाकिस्तान म्हणजे इंजिनशिवाय कार.''
''राक्षसाला क्रिकेट खेळावं वाटलं असेल, म्हणून रविंद्र जडेजाचा जन्म झाला.''
''कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या धोनीच्या निर्णयाचा आदर आहे. धोनीचं भारतीय क्रिकेटसाठीचं योगदान शब्दात सांगता न येणारं आहे.''
''मी जेव्हा मरेल, तेव्हा धोनीने 2011 विश्वचषकात लगावलेला तो ऐतिहासिक षट्कार पाहायची इच्छा असेल.''
''लहान क्रिकेटर किती धावा काढतात यावर भारतीय क्रिकेटचं भविष्य अवलंबून आहे.''
''श्रीकांत शुद्ध शाकाहारी आहे, त्याने माशी मारली तरी त्याला त्रास होईल.''
''खेळात कोणत्याही स्तरावर तुलना करणं अयोग्य आहे. आजची पिढी आणि पूर्वीची पिढी यांच्यातील तुलना तर बिलकूल अयोग्य आहे. ''
''मेक्सिको ऑलिम्पीक 1968 साली बॉब बोमन्सच्या उंच उडीच्या रेकॉर्डची केवळ तुलना केली जाऊ शकते. त्या काळात असं रेकॉर्ड करणं खरोखर कठीण होतं. सचिनचं आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये 50 शतकं झळकावण्याचं रेकॉर्ड देखील असंच आहे.''