IND Vs AUS 4th T20 Highlights : टीम इंडियाने वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला. मायदेशातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिका 3-1 ने जिंकली आहे. यासह जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 विजय मिळवण्याचा पराक्रम करत पाकिस्तानला मागे टाकले आहे. टीम इंडियाने रायपूर टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची टी-20 मालिका जिंकली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 20 षटकात केवळ 154 धावाच करू शकला. रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी टीम इंडियाच्या फलंदाजीत आपली ताकद दाखवली. अक्षर पटेलच्या फिरकीने गोलंदाजीने धमाका करत तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाने आता या T20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.


रिंकू आणि जितेशची दमदार खेळी


रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीला दिले. येथे भारतीय सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावा जोडल्या. या एकूण धावसंख्येवर यशस्वी (37) बाद झाला आणि त्यानंतर टीम इंडियाने श्रेयस अय्यर (8) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (1) यांची झटपट विकेटही गमावली. टीम इंडियाने 63 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. येथून रिंकू सिंहसह ऋतुराज गायकवाडने डावाची धुरा सांभाळली. गायकवाडही ३२ धावा करून बाद झाला तेव्हा रिंकू आणि जितेश शर्मा यांनी डाव पुढे नेला. दोघांनी 32 चेंडूत 56 धावांची जलद भागीदारी केली.


रिंकू आणि जितेश जेव्हा क्रीझवर होते तेव्हा टीम इंडिया आज पुन्हा एकदा 200 पार करेल असं वाटत होतं. पण इथे जितेश 19 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. ही भागीदारी तुटल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून तुफान खेळी झाली आणि शेवटच्या ५ विकेट अवघ्या 7 धावांत पडल्या. अक्षर पटेल (0), रिंकू सिंग (46), दीपक चहर (0) आणि रवी बिश्नोई (1) पॅव्हेलियनमध्ये परतले. अशाप्रकारे भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 174 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशियसने 4 षटकात 40 धावा देत 3 बळी घेतले. बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघालाही २-२ बळी मिळाले. अॅरॉन हार्डीनेही एक विकेट घेतली.


टी-20 मालिका जिंकत जागतिक पराक्रमही केला नावावर!




दुसरीकडे, पाकिस्तानने टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत एकूण 226 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 135 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने सध्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून T20 इतिहासातील 136 वा विजय देखील मिळवला. भारतीय क्रिकेट संघाने 135 टी-20 सामने जिंकण्यासाठी पाकिस्तानपेक्षा खूपच कमी वेळ घेतला आहे. पाकिस्तानने इतके सामने जिंकण्यासाठी 226 टी-20 सामने खेळले होते, तर भारताने केवळ 209 टी-20 सामन्यांमध्ये इतके सामने जिंकले.


इतर महत्वाच्या बातम्या