ढाका (बांगलादेश): चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानने भारताला हरवल्यामुळे, नाराज झालेल्या बांगलादेशच्या चाहत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

रविवारी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला 180 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे अनेकांचा बांध फुटला. कोणी टीव्ही फोडले तर कोणी जाहीर नाराजी व्यक्त केली.

मात्र बांगलादेशी चाहत्याने टोकाचं पाऊल उचललं. बिद्युत या 25 वर्षीय बांगलादेशी चाहत्याने थेट रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली.

बिद्युत हा टीम इंडियाचा मोठा चाहता होता. फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवामुळे तो खूपच निराश झाला होता. त्यामुळेच नाराज झालेल्या बिद्युतने रेल्वेखाली उडी घेतली.

पाकिस्तानचा भारतावर विजय

जगाचं लक्ष लागलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानने आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळालं.

पाकिस्तानी संघाने ठेवलेलं 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली. हार्दिक पांड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

संबंधित बातम्या

सरफराजच्या नेतृत्त्वात कोहली खेळणार, धोनी आऊट, आयसीसीचा संघ जाहीर

पाककडून दारुण पराभवानंतरही कोहलीची खिलाडूवृत्ती

चिवट सरफराजने तेव्हाही भारताला 71 धावात गुंडाळून विश्वचषक जिंकला होता!