न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर आणि इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यांमध्ये फारशी चमक दाखवू न शकलेल्या गौतम गंभीरला सोळा सदस्यीय संघातूनही वगळण्यात आलं आहे.
गौतम गंभीरऐवजी भुवनेश्वर कुमार हा भारताच्या कसोटी संघात करण्यात आलेला एकमेव बदल आहे. न्यूझीलंडविरुद्ध कोलकाता कसोटीत पाच विकेट घेणारा भुवनेश्वर पाठीच्या दुखापतीमुळे सहा आठवड्याहून अधिक क्रिकेटपासून दूर होता.
भुवनेश्वर संघात आल्यानं आता कर्णधार विराट कोहलीला वेगवान गोलंदाजीसाठी चार पर्याय उपलब्ध आहेत.