टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव जाहीरपणे सांगितलं आहे. भुवीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसत आहे. भुवीने हा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करताच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.
“हेयर इज द बेटर हॉफ ऑफ द पिक्चर @नुपूर नागर’’ असं कॅप्शन भुवीने फोटोला दिलं. 11 मे रोजी भुवीने एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आणि ‘डिनर डेट फुल पिक सून’ असं कॅप्शन दिलं. त्यानंतर आता भुवीने पूर्ण फोटो शेअर करुन सस्पेंस संपवला आहे.
भुवीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत शानदार प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर 7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टी-20 मालिकेतही तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.