नवी दिल्ली: आयपीएलच्या 10 व्या मोसमासाठी आज बंगळुरुमध्ये लिलाव झाला. यामध्ये सर्वाधिक बोली इंग्लडच्या बेन स्टोक्सवर लावण्यात आली. स्टोक्ससाठी रायझिंग पुणे सुपरजायटंसनं सर्वाधिक म्हणजे तब्बल 14 कोटी 50 लाखांची बोली लावली. या लिलावानंतर स्टोक्सनं पहिल्यांदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.


पुणे सुपरजायंटस् टीममध्ये स्टोक्सचा समावेश झाल्यानंतर, स्टोक्स म्हणाला की, '' रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघात समावेश झाल्याबद्दल मी आनंदी आहे. तसेच आयपीएलमध्ये खेळण्यासाठीही अतिशय उत्साही आहे.

यावेळी त्याच्या एका चाहत्याने पुणे संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि विद्यमान कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांच्यासोबत खेळण्यासंदर्भातील प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना स्टोक्स म्हणाला की, ''धोनी आणि स्मिथ दोघेही महान खेळाडू आहेत. आम्ही आतापर्यंत एकमेकाविरोधात खेळलो. पण आता आम्ही यावेळी एकत्रित खेळू. त्यांच्यासोबत खेळताना मला वेगळा अनुभव नक्की मिळेल.''

बेन स्टोक्सची पहिली प्रतिक्रिया पाहा