वन डे आणि ट्वेण्टी 20 मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बुधवारी मायदेशी रवाना झाला. पण जाण्याआधी किवी फलंदाज रॉस टेलरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सहकारी इश सोढी आणि स्टाफ सदस्य देव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला.
'धुलाई के बाद सिलाई', सेहवागचं रॉस टेलरला उत्तर
इमोशनल मेसेजबरोबरच त्याने सेहवागला आणखी एक आव्हान देत त्याच्या हिंदी मेसेजमागचं रहस्यही उलगडलं.
रॉस टेलर म्हणतो, "भारतात येऊन नेहमीप्रमाणे आनंद मिळाला. वीरेंद्र सेहवागला हिंदीतू उत्तर शकलो, त्यामागे हे दोघे आहेत. देव आणि सोढी धन्यवाद. जाण्याआधी अखेरचा मेसेज, धुलाई और सिलाई आने वाले समय में जारी रहेगी!"
...अगली सिलाई त्रिवेंद्रम में, टेलरकडून सेहवागची फिरकी
खरंतर वीरेंद्र सेहवाग ट्विटरवरुन अनेकांची फिरकी घेत असतो. मात्र न्यूझीलंडच्या रॉस टेलरने त्याच्याच भाषेत सेहवागला उत्तर दिलं होतं. सुरुवातीला सेहवागने टेलरचा उल्लेख 'दर्जी' केल्यानतंर, त्याने हिंदीत उत्तर दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर ट्वेण्टी 20 मालिकेदरम्यान दोघांच्या मजेशीर ट्वीटचा सिलसिला सुरु होता. त्यांचे चाहतेही दोघांच्या रंजक संभाषणाचा आनंद लुटत होते.
सेहवागकडून टेलरचा 'दर्जी' उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर
https://twitter.com/RossLTaylor/status/922361751571652609
https://twitter.com/RossLTaylor/status/922369075992453120
https://twitter.com/virendersehwag/status/922372039884681217
https://twitter.com/RossLTaylor/status/927121062239920128
https://twitter.com/UIDAI/status/927392657554341889
मात्र आता मायदेशी रवाना होण्यापूर्वी, सेहवागला हिंदीत उत्तर देण्यासाठी हे दोघे आपली मदत करत असल्याचं रॉस टेलरने सांगितलं आणि त्याच्या हिंदी मेसेजच्या रहस्याचा उलगडला केला.