मुंबई: टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखेर भरत अरूणची निवड करण्यात आली आहे. तर सहाय्यक प्रशिक्षकपदी संजय बांगरची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवा. आर. श्रीधरची क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. आज (मंगळवार) झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यामुळे रवी शास्त्रींना हवा असणारा स्टाफ आता मिळाल्यानं सहाजिकच द्रविड आणि झहीर खानचा पत्ता आपोआपच कट झाला आहे.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची गोलंदाजी सल्लागार नियुक्ती केली होती. यावरुनच बराच वाद उद्भवला होता.



दरम्यान, रवी शास्त्री यांना अखेर त्यांचा हवा असणार स्टाफ मिळाला आहे. रवी शास्त्री आणि भरत अरुण हे मागील अगदी सुरुवातीपासून मित्र आहेत.

तसं पाहता अरुण यांच क्रिकेट करिअर फार काही मोठं नाही. भारतासाठी त्यांनी केवळ दोन कसोटी सामने आणि चार वनडे खेळल्या आहेत. सहा आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने फक्त 5 बळी घेतले आहेत. तर एकूण 25 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या:

झहीरऐवजी भरत अरुण टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक होणार?

द्रविड आणि झहीर यांचा अपमान सुरु आहे: रामचंद्र गुहा

... म्हणून रवी शास्त्रींनी सेहवागवर मात केली!

सचिन, गांगुली, लक्ष्मणचा लेटरबॉम्ब, रवी शास्त्रींवर नाराजी?