बीसीसीआयच्या प्रशासनात लोढा समितीच्या शिफारशी सहजतेने कशा लागू करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
या समितीची उद्यापर्यंत स्थापना करण्यात येईल. तसंच बीसीसीआयशी संबंधित 5-6 सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात येईल. या समितीने लोढा समितीच्या शिफारशींपैकी लागू करण्यास कठीण असलेल्या शिफारशींचा अभ्यास करून, त्याविषयीचा आपला अहवाल 15 दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीला सादर करायचा आहे, अशी माहिती बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली.
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना कठोर वाटत असलेल्या लोढा समितीच्या शिफारशी कोणत्या?
- एक राज्य, एक मत
- बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना 70 वर्षांची कमाल वयोमर्यादा
- सलग तीन वर्ष एखादं पद भूषवल्यानंतर प्रशासनात पुन्हा येण्यासाठी किमान तीन वर्षे सक्तीची विश्रांती.
- बीसीसीआयच्या निवड समितीत 5 ऐवजी केवळ तीनच सदस्य