मुंबई : ‘देवधर ट्रॉफी’ या भारतातील सिनियर वन डे टुर्नामेंटसाठी बीसीसीआयने तीन संघांची घोषणा केलीय. भारताच्या रवीचंद्रन अश्विन आणि अजिंक्य रहाणे या कसोटी शिलेदारांचा देवधर ट्रॉफीसाठीच्या संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. इंडिया-ए, इंडिया-बी आणि इंडिया-सी या तीन संघांमध्ये 23 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात सामने खेळवले जातील. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील इंडिया-ए संघात अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेवर ठसा उमटवणारा पृथ्वी शॉही इंडिया-ए संघातून खेळेल. इंडिया-सी संघाच्या नेतृत्वाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचं कर्णधारपद सांभाळणारा युवा क्रिकेटर श्रेयस अय्यर इंडिया-बी संघाचं नेतृत्त्व करणार आहे. नुकतेच कसोटी संघात स्थान पटकावणारा मयांक अग्रवाल आणि इंग्लंडमधून कसोटीत पदार्पण करणारा हनुमा विहारीलाही संघात घेण्यात आले आहे. मनोज तिवारी, शाहबाज नदीम यांसारखे अनुभवी खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. संघ : इंडिया-ए : दिनेश कार्तिक (कर्णधार /विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अनमोलप्रीत सिंह, अभिमन्यू ईश्वरन, अंकित बवाने, नितीश राणा, करुण नायर, क्रुणाल पांड्या, रविचंद्रन अश्विन, श्रेयस गोपाल, शम्स मुलानी, मोहम्मद सिराज, धवल कुलकर्णी, सिद्धार्थ कौल इंडिय-बी : श्रेयस अय्यर (कर्णधार), मयंक अग्रवाल, रितूराज गायकवाड, पीएस. चोप्रा, हनुमा विहारी, मनोज तिवारी, अंकुश बैंस (विकेटकीपर), रोहित रायडू, कृष्णप्पा गौतम, मयंक मारकंडे, शाहबाज नदीम, दीपक चहर, वरुण अरॉन, जयदेव उनादकट इंडिया-सी :- अंजिक्य रहाणे (कर्णधार), अभिनव मुकुंद, शुभमन गिल, आर. समर्थ, सुरैश रैना, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), विजय शंकर, वॉशिंगटन सुंदर, राहुल चहर, पप्पू रॉय, नवदीप सैनी, रजनीश गुरबानी, उमर नजीर