बांगलादेशचा क्रिकेटपटू बाउन्सरने जखमी
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2016 11:33 AM (IST)
ढाका : बांगलादेश क्रिकेट संघातील अष्टपैलु खेळाडू सुहरावादी सुवरो शनिवारी ढाका प्रिमिअर लीगमध्ये खेळताना बाउन्सर बॉल लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी ढाका प्रिमिअर लीगमध्ये व्हीक्टोरिया स्पोर्टींग क्लब आणि अबाहानी लिमिटेड यांच्या दरम्यान टी २० सामना खेळण्यात येत होता. यावेळी अबाहानी लिमिटेडचे वेगवान गोलंदाज तासकीन अहमद याचा बाउन्सर व्हीकेटोरिया स्पोर्टींग क्लबकडून खेळणाऱ्या सुहरावादी सुवरो याच्या डोक्याला लागला. यानंतर जखमी सुवरोला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर देबाशीष चौधरी यांनी सांगितले. सुवेरा याने बांगलादेश संघाकडून एक कसोटी आणि १७ एक दिवसीय सामने खेळले आहेत.