Continues below advertisement
Continues below advertisement
1/7
यावेळी रंगना हेराथने सर्वाधिक 16 षटकं निर्धाव टाकली. तर संदाकान 8 , धनंजय डिसिल्व्हाने 7 षटकं मेडन टाकली. ( फोटोः ट्विटर)
2/7
पालेकल कसोटीच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाची 63 षटकांत आठ बाद 161 अशी अवस्था केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पीटर नेव्हील आणि स्टीव्ह ओकीफनं 25 षटकं आणि तीन चेंडू खेळून काढले, पण त्यांना एकही धाव करता आली नाही.
3/7
ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयादरम्यान श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी सलग सर्वाधिक निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम रचला. एकाच कसोटी सामन्यात सलग 25 हून अधिक षटकं एकही धाव न देण्याचा विक्रम लंकेच्या नावावर जमा झाला आहे.
4/7
श्रीलंकेच्या या विजयात कुशल मेंडिस आणि रंगना हेराथचा मोठा वाटा आहे. खरं तर श्रीलंकेचा पहिला डाव 117 धावांवर आटोपला होता. त्यानंतर हेराथनं चार आणि संदाकननं चार विकेट्स काढून ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 203 असं रोखलं होतं. मग दुसऱ्या डावात कुशल मेंडिसच्या झुंजार 176 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं 353 धावांची मजल मारून, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 268 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण कांगारूंना 161 धावांचीच मजल मारता आली.
5/7
हेराथनं पाच तर संदाकननं तीन विकेट्स काढल्या. कुशल मेंडिसला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
Continues below advertisement
6/7
दोन्ही टीम्समध्ये आजवर झालेल्या 27 कसोटी सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियानं 17 सामने जिंकले असून आठ लढती अनिर्णित राहिल्यात. 1999 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेनं कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे.
7/7
कोलंबो: पालेकल कसोटीत श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियावर 106 धावांनी मात केली आणि ऐतिहासिक विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसराच विजय ठरला.
Published at : 30 Jul 2016 05:15 PM (IST)