रिओ डि जिनेरिओ: सोमवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये 300 मीटर स्टीपलचेजच्या अंतिम फेरीत भारतीय अॅथलेटिक्सपटू ललिता बाबर इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. पीटी उषानंतर ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्सच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ललिता ही दुसरी भारतीय ठरल्याने तिच्या कामगिरीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

 

सातारा जिल्ह्यातील 27 वर्षीय ललिताला सोमवारी पदक जिंकण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. ललिताने 19.76 सेकंदात राष्ट्रीय रेकॉर्ड सोबतच आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहून अंतिम सामन्यासाठी पात्र ठरली.

 

तिच्या या उल्लेखनीय कामगिरीनंतर सध्या सोशल मीडियावर तिचे आई-वडील सध्या महाराष्ट्रातील विविध मंदिरात जाऊन पुजा करून देवाला साकडं घालत आहेत. जर तिने सोमवारच्या सामन्यातही उल्लेखनीय कामगिरी केल्यास, भारतीय अॅथलेटिक्समध्ये नवा इतिहास लिहिला जाईल.

 

अंतिम सामन्यावेळी ललिताला विश्व चॅम्पियन, या सीझनमधील सर्वोत्कृष्ठ अॅथलेटिक्सपटूंचा सामना करावा लागणार आहे. यावेळी तिच्या विरोधात बिजिंगमध्ये झालेल्या पाच विश्व चॅम्पियनही असणार आहेत.