कोलंबो : श्रीलंकेतील पाल्लेकलमध्ये सुरु असलेल्या टी20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला हरवलं आहे. सलामीवीर ग्लॅन मॅक्सवेलच्या 145 धावांच्या नाबाद खेळीमुळे ऑस्ट्रेलिअन संघाने श्रीलंकेला 85 धावांनी हरवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
मॅक्सवेलने 65 चेंडूत 14 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने टी20मध्ये दुसरी सर्वोत्कृष्ठ खेळी रचली आहे. मॅक्सवेलच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने 263 धावा बनवल्या आहेत. यापूर्वीचा सर्वाधिक धावांचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने 2007 मध्ये केनियाविरुद्धच्या सामन्यात 260 धावा बनवल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या दिनेश चांदीमल आणि चामरा कपुगेदारा यांनी 178 धावांची खेळी करु शकले. त्यामुळे श्रीलंकेला या सामन्यात हार पत्करावी लागली. ऑस्ट्रलियाच्या जलदगती गोलंदाज स्कॉट बोलँड आणि मिशेल स्टार्क यांनी 26-26 धावा देत प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
मॅक्सवेलने आपल्या 35व्या सामन्यात पहिलं टी20 मधील शतक झळकावलं. मॅक्सवेलच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला टी20 मध्ये आघाडी मिळाली आहे.