हृतिकचं फेसबुक अकाऊंट हॅक, हजारोंशी चॅटिंग
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2016 06:17 PM (IST)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचं फेसबुक अकाऊंट एका तरुणाकडून हॅक करण्यात आलं. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकरने हजारोंशी लाईव्ह चॅट केली. तसंच प्रोफाईल फोटोही बदलला. सध्या हे प्रकरण नियंत्रणात असल्याची माहिती आहे. हृतिकने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. अकाऊंट हॅक केल्यानंतर चाहत्यांशी लाईव्ह चॅट करायला देखील सुरुवात केली. विशेष म्हणजे अडीच ते तीन हजार चाहत्यांनी हॅकरसोबत लाईव्ह चॅट केली. दरम्यान हृतिकच्या टिमने प्रोफाईल फोटो बदलला असून अकाऊंट काही काळासाठी डिअॅक्टीव्ह केलं. त्यानंतर सर्व व्हिडिओ चॅटिंग डिलिट करण्यात आली आहे.