लखनौ : वर्ल्ड कपमध्ये पहिले दोन सामने गमावल्याने पाच वेळेचा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाची (Australia vs Sri Lanka) अवस्था सध्या बिकट झाली आहे. इथून पुढे त्यांचा प्रत्येक सामना हा करो वा मरो अशा स्थितीमधील असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज त्यांची लढत श्रीलंकेशी होत आहे. श्रीलंकेची अवस्था सुद्धा त्याच पद्धतीने झाली आहे.
श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. आजच्या सामन्यामध्ये श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. श्रीलंकन फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना जबरदस्त सुरुवात केली.
सलामीवीर निसांका आणि कुसल परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावा जोडत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची हवा काढली. दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेला दमदार सुरुवात करता आली. मात्र, दमदार सुरुवातीचा फायदा श्रीलंकन फलंदाजांना घेता आला नाही. बिनबाद 125 वरून 32 षटकांत 4 4 बाद 177 असा डाव कोलमडला आहे. दोन्ही सलामीवीर अर्धशतक करून बाद झाले. निसांका 61 धावांवर बाद झाला, तर परेरा 78 धावांवर बाद झाला. या दोन्ही विकेट पॅट कमिन्सने घेतल्या. झम्पाने दोन विकेट घेत श्रीलंकेला धक्का दिला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी होत नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. गेल्या पाच वर्ल्डकप सामन्यांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वच विरोधी संघ सलामीला यशस्वी ठरले आहेत. मागील सामन्यांमध्ये आजच्या सामन्यांमध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी 108 धावांची सलामी दिली. पहिल्या सामन्यामध्ये केवळ भारतीय संघाला सुरुवातीला हादरे देण्यात यश ऑस्ट्रेलियन गोलंदाजीला यश आले होते.
2019 मध्ये वर्ल्डकपच्या लढतीत इंग्लंडच्या सलामीवीरांनी 124 धावा कुटल्या होत्या. तत्पूर्वी, 2019 मध्येच दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी 79 धावांची सलामी दिली होती. त्यामुळे मागील पाच सामन्यांमध्ये वर्ल्डकपच्या अनुषंगाने पाहिल्यास ऑस्ट्रेलियाची कामगिरी साजेशी झाली नाही. त्यामुळे कोणी पण या आणि मारून जावा अशी स्थिती त्यांची झाली आहे. दरम्यान, आजच्या सामन्यांमध्ये आणखी एक पराक्रम नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपमध्ये दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक झळकवण्याची ही पाचवी वेळ ठरली.
दोन्ही सलामीवीरांनी विश्वचषकात AUS विरुद्ध 50+ धावा
- ग्रॅहम गूच आणि इयान बॉथम, सिडनी 1992
- ग्रॅमी स्मिथ आणि एबी डिव्हिलियर्स, बॅसेटेरे 2007
- रोहित शर्मा आणि शिखर धवन, ओव्हल 2019
- डी करुणारत्ने आणि कुसल परेरा, ओव्हल 2019
- पी निसांका आणि कुसल परेरा, लखनौ 2023*
विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचे ५ सलामीचे सामने
- 79 - क्यू डी कॉक आणि ए मार्कराम, मँचेस्टर 2019 (हरवले)
- 124 - जे बेअरस्टो आणि जे रॉय, बर्मिंगहॅम 2019 (हरवले)
- 2 - इशान किशन आणि आर शर्मा, चेन्नई 2023 (हरवले)
- 108 - टी बावुमा आणि क्यू डी कॉक, लखनौ 2023 (हरवले)
- 100* - पी निसांका आणि केजे परेरा, लखनौ 2023 (??)*
इतर महत्वाच्या बातम्या