Australia vs India, 3rd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना गाबामध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 260 धावांवरच आटोपला.भारतासाठी रवींद्र जडेजानंतर केएल राहुल, आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बुमराह-आकाशदीपने चौथ्या दिवशी भारताला फॉलोऑनपासून वाचवले. बुमराह आणि आकाशदीप यांच्यात 47 धावांची भागीदारी झाली. त्याचवेळी पाचव्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला ट्रॅव्हिस हेडने आकाशदीपला बाद केले.


छोट्या चाहत्याकडून सिराज स्टाईल सेलिब्रेशन


यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला प्रारंभ झाला. दुसऱ्या बुमराह, सिराज आणि आकाश दीपने धारदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. भारतासाठी हेडॅक ठरत असलेल्या हेडला अवघ्या 17 धावांवर बाद करत सिराजने मोठे यश मिळवून दिले. यानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांनी जल्लोष केलाच, पण बाल चाहत्याच्या आनंदाला उधाण आले. सिराजने ज्या पद्धतीने हेडला हातवारे करत डिवचण्याचा प्रयत्न केला, अगदी त्याच पद्धतीने त्याने हातवारे करत सिराज बाद झाल्याचा आनंद प्रेक्षक गॅलरीतून व्यक्त केला. त्यामुळे त्याच्या ग्रँड सेलिब्रेशनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 






आणि ट्रॅव्हिस हेडला 'सॉरी' म्हणावे लागले


दरम्यान, पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला एक मजेदार क्षण देखील दिसला, जेव्हा आकाश दीपने दिवसाच्या दुसऱ्या षटकात नॅथन लियॉनच्या षटकात असे काही केले, ज्यामुळे ट्रॅव्हिस हेडला 'सॉरी' म्हणावे लागले. मैदानाच्या मध्यभागी आकाश दीप आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. नॅथन लियॉनच्या दुसऱ्या षटकात आकाश दीपच्या पॅडमध्ये एक चेंडू अडकला. शॉर्ट लेगच्या दिशेने उभा असलेला ट्रॅव्हिस हेड चेंडू घेण्यासाठी त्याच्या दिशेने येत होता. आकाशदीपने पॅडमधून चेंडू काढला आणि हातात नाही तर जमिनीवर सोडला. चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेड रागावलेला दिसत होता. मात्र, आकाशदीपने जाणीवपूर्वक चेंडू टाकला नाही. हेडकडे बघत तो सॉरी-सॉरी म्हणाला. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.






आकाशदीप आणि बुमराहने वाचवले


भारतीय संघाच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल 4 धावांवर बाद झाली. त्याच्यानंतर गिलने एक धाव घेतली आणि कोहलीही 3 धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. ऋषभ पंतच्या बॅटमधून 9 धावा झाल्या. कर्णधार रोहित शर्मा 10 धावांवर बाद झाला. केएल राहुलने टीम इंडियाचा डाव आटोक्यात ठेवला. त्याला साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा आला. या सामन्यात केएल राहुलने 84 धावा केल्या आणि जडेजाने 77 धावांची खेळी केली. जडेजा बाद झाल्यानंतर आकाशदीपने बुमराहसह 47 धावांची भागीदारी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले.


इतर महत्वाच्या बातम्या