IPO Listing Today मुंबई : भारतीय शेअर बाजारात बीएसई आणि एनएसईवर तीन मेन बोर्ड आयपीओ लिस्ट होणार आहेत. यामध्ये विशाल मेगा मार्ट, मोबिक्विक आणि साई लाईफ सायन्सेस च्या आयपीओचा समावेश आहे. तीन आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद देत तगडं सबस्क्रिप्शन केलं होतं. ज्या गुंतवणूकदारांना या कंपन्यांच्या आयपीओचे शेअर अलॉट झाले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण या तिन्ही आयपीओच्या जीएमपीनुसार लिस्टींग झाल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.
विशाल मेगा मार्ट
विशाल मेगा मार्टचा आयपीओच्या माध्यमातून 8 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न होता. हा आयपीओ 29 पट सबस्क्राइब झाला होता संस्थात्मक आणि गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या आयपीओला मोठ्या प्रमाणात सबस्क्राइब केलं होतं. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 78 रुपये निश्चित केला होता. ग्रे मार्केट प्रीमियमचा विचार केला असता आयपीओचं लिस्टींग 100 रुपयांच्या जवळपास होऊ शकतं. त्यामुळं गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 28 टक्के परतावा मिळू शकतो.
वन मोबिक्विक सिस्टीम्स
स्टॉक एक्सचेंजवर वन मोबिक्विक सिस्टीम्सच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग होण्याची शक्यता आहे. या आयपीओचा जीएमपी 58 टक्के म्हणजेच 160 रुपये दाखवत आहे. मोबिक्विकच्या आयपीओचं दमदार लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 279 रुपये प्रतिशेअर निश्चित केला होता. जीएमपीनुसार आयपीओ लिस्ट झाल्यास एक शेअर 440 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ 126 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांनी 142 पट आयपीओ सबसक्राइब केला होता. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आयपीओ 126 पट सबस्क्राइब केला होता. कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून 576 कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न आहे.
साई लाइफ सायन्सेस
साई लाइफ सायन्सेसच्या आयपीओ ( Sai Life Sciences Limited IPO) चं देखील चांगलं लिस्टींग होण्याची शक्यता आहे. या आयपीओचा जीएमपी विशाल मेगा मार्ट किंवा मोबिक्विक पेक्षा कमी आहे. आयपीओचा जीएमपी 13 टक्के असून त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास प्रतिशेअर परतावा 72 रुपये मिळू शकतो.कंपनीनं किंमतपट्टा 549 रुपये निश्चित केला होता. जीएमपीनुसार आयपीओ 621 रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. कंपनीचा आयपीओद्वारे 3042 कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न होता. हा आयपीओ 10.27 पट सबस्क्राइब झाली होती.
इतर बातम्या :
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)