लंडन : ऑस्ट्रेलियाने इंग्लडविरुद्धच्या अॅशेस कसोटी मालिकेदरम्यानही चेंडूशी छेडछाड केली होती. असा थेट आरोप इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने केला आहे.


द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या खेळांडूना बॉल टॅम्परिंग प्रकरण भलतंच महागात पडलं आहे. स्टिव्ह स्मिथची कर्णधारपदावरुन तर वॉर्नरची उपकर्णधार पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तर आयसीसीनेही त्यांच्यावर एका सामन्याची बंदी घातली आहे.

यावेळी स्पष्टीकरण देताना स्मिथने असं म्हटलं होतं की, आपल्या नेतृत्त्वात असं पहिल्यांदाच घडलं. पण इंग्लंडचा माजी कर्णधार वॉन याचं असं म्हणणं आहे की, हा सर्व प्रकार मागील बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीती वॉन असं म्हणाला की, 'मला असं अजिबात वाटत नाही की, हा प्रकार पूर्वी कधीच झाला नसेल. मी बऱ्याचदा पाहिलं होतं की, अनेक ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपल्या बोटांवर बऱ्याच पट्ट्या बांधल्या होत्या, खासकरुन अॅशेस मालिकेदरम्यान. ते मिड ऑफ आणि मिड ऑनवर उभे राहायचे. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. पण तुम्हाला माहिती आहे की, ते कोण होते.'

'मला पूर्ण खात्री आहे की, अॅशेस मालिकेतही असंच काहीसं झालं होतं.' असाही दावा वॉनने केला आहे.

संबंधित बातम्या :


समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड!

VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील


व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास


चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद


तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल


स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!


'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं


क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना


स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई