यापूर्वी ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेने 2007 साली केनियाविरुद्ध खेळताना 260 धावा केल्या होत्या. मॅक्सवेलने 49 धावांत शतक पूर्ण केलं. यामध्ये 14 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाच्या वतीने तिसऱ्या विकेटसाठी ट्रेविस हेड आणि मॅक्सवेल यांनी 109 धावांची भागीदारी केली. मात्र शेवटच्या चेंडूवर ट्रेडचा बळी घेण्यास श्रीलंकेला यश आलं. मॅक्सवेलची ही खेळी ट्वेंटी-ट्वेंटीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी खेळी आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच एरॉन फिंचने इंग्लंडविरुद्ध 156 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.