अॅडलेड : ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून सलग पाच कसोटी पराभवांनंतरचा पहिला कसोटी विजय साजरा केला. पण तीन कसोटी सामन्यांच्य़ा मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं 2-1 असा विजय मिळवला.
अॅडलेडमधल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 127 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियानं त्या लक्ष्याचा तीन विकेट्स गमावून यशस्वी पाठलाग केला.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनं 47 आणि स्टीव्हन स्मिथनं 40 धावांची खेळी केली. त्याआधी, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनं चार आणि नॅथन लायननं तीन विकेट्स काढून, दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 250 धावांत गुंडाळला.
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर स्टीफन कूकनं 240 चेंडूंत 104 धावांची खेळी उभारली.