Asian Games 2023, India : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट सुरु ठेवली आहे. तीरंदाज ओजस देवताले, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 21 गोल्ड झाली आहेत.  


 तीरंदाज ओजस देवताले, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी दक्षिण कोरियाचा पराभव करत भारताला गोल्ड मिळवून दिले. भारताच्या टीमने 235-230 असा विजय मिळवला. फायनल सामन्यात अभिषेक, ओजस आणि प्रथमेश यांनी शानदार प्रदर्शन केले.  










मिक्स्ड डबल्स स्क्वैशमध्ये गोल्ड - 


Dipika Pallikal and Harinder Pal Singh : मिक्स्ड डबल्स स्क्वैश स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे.  दीपिका पल्‍लीकल कार्तिक आणि हरिंदर पाल सिंह संधू या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. दीपिका आणि हरिंदर या जोडीने मलेशियाच्या बिंती अजमा आणि मोहम्मद साफिक यांचा पराभव केला. रोमांचक सामन्यात भारतीय जोडीने पहिला सेट 11-10 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये दीपिका आणि हरिंदर 9-3 ने आघाडीवर होते, पण मलेशिया जोडीने दमदार कमबॅक करत बरोबरी साधली. पण अखेरीस भारताच्या जोडीने 11-10 असा विजय मिळवला आहे. 


महिला आर्चरीमध्ये गोल्ड -
Jyothi, Aditi and Parneet: Jyothi, Aditi and Parneet : आर्चरी महिला कंपाउंड स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळाले. ज्योती, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी महिला कंपाउंड आर्चरीमध्ये गोल्ड सुवर्णभेद घेतला. भारताच्या तिकडीने चीनी ताइपेच्या संघाला 230-219 असा पराभव केला.  


Asian Games 2023 12th Day Live : भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव -
भारतीय महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण सेमीफायनलमध्ये चीनकडून पराभव पत्कारावा लागला आहे. सेमीफायनलमध्ये चीनने भारताच्या संघाचा 4-0 ने पराभव केला. आता भारतीय संघ कांस्य पदकासाठी मैदानात उतरणार आहे.