जकार्ता : भारतीय पुरुषांच्या एशियाड कबड्डीमधल्या आजवरच्या निर्विवाद वर्चस्वाला सुरुंग लागला. जकार्ता एशियाडमध्ये भारतीय पुरुषांना कबड्डीच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाकडून 23-24 अशा निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
या पराभवाने भारताच्या कबड्डीतल्या आव्हानाला धोका नसला तरी, दक्षिण कोरियाकडून झालेल्या पराभवाने भारतीय शिलेदारांची मान शरमेने झुकली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताचा हा पहिला पराभव आहे.
एशियाडच्या इतिहासात भारताने पुरुष कबड्डीत सलग सात सुवर्णपदकांची केली आहे. भारतीय पुरुषांनी त्याच लौकिकाला साजेसा खेळ करुन बांगलादेश आणि श्रीलंका संघांना साखळीत हरवलं आहे. पण दक्षिण कोरियाने भारतावर बाजी उलटवून कमाल केली.
भारतीय खेळाडूंच्या खेळाशी परिचित असलेल्या जँग कुन लीच्या अनुभवाचा फायदा दक्षिण कोरियाला झाला. सामन्याच्या अखेरीस एक अंक मिळवून त्याने दक्षिण कोरियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
आशियाई स्पर्धा : कबड्डीत भारताला मोठा धक्का, द. कोरियाकडून पराभव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2018 05:08 PM (IST)
या पराभवाने भारताच्या कबड्डीतल्या आव्हानाला धोका नसला तरी, दक्षिण कोरियाकडून झालेल्या पराभवाने भारतीय शिलेदारांची मान शरमेने झुकली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -