जकार्ता : भारताच्या रोईंग चमूने 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चार जणांच्या संघामध्ये महाराष्ट्रातील तळेगावच्या दत्तू भोकनळचा समावेश आहे.
यंदाच्या एशियाड गेम्समधील हे भारताचं पाचवं सुवर्णपदक ठरलं. दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंग, ओम प्रकाश आणि सुखमीत सिंग यांनी पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स या रोईंग प्रकारात भारताची मान अभिमानाने उंचावली. या संघाने 6.17.13 मिनिटांची वेळ नोंदवली.
रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळत असताना दत्तूची आई आजारी होती. त्याच वर्षी दत्तूवरील मातृछत्र हरपलं. त्यामुळे दत्तू काही काळ निराश होता.
एशियाड गेम्समध्ये मेन्स सिंगल स्कल्स प्रकारात आईसाठी सुवर्णपदक जिंकण्याचा त्याचा मानस होता. मात्र सहाव्या स्थानी आल्याने त्याचं पदक हुकलं.
दत्तू हा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला एकमेव रोईंगपटू होता. 27 वर्षांच्या दत्तूने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय रोईंग स्पर्धांमध्ये पदकं कमावली आहेत.
Asian Games 2018 : पुरुषांच्या रोईंग कॉड्रापल स्कल्समध्ये सुवर्ण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2018 11:31 AM (IST)
भारताच्या रोईंग चमूने 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली, यामध्ये महाराष्ट्रातील दत्तू भोकनळचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -