Asian Games 2018 : सडन डेथमध्ये भारताचा मलेशियाकडून पराभव
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2018 06:38 PM (IST)
दोन्ही संघांमधला हा सामना निर्धारित वेळेत 2-2 असा आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही 2-2 असा बरोबरीत सुटला होता.
जकार्ता : गतविजेत्याला भारताला एशियाडमधल्या पुरुषांच्या हॉकीत उपांत्य फेरीतच हार स्वीकारण्याची वेळ आली. अटीतटीच्या या सामन्यात मलेशियाने सडन डेथमध्ये भारताचा 7-6 असा पराभव केला. दोन्ही संघांमधला हा सामना निर्धारित वेळेत 2-2 असा आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही 2-2 असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सडन डेथमध्ये पाचव्या प्रयत्नात भारताच्या सुनीलला गोल करण्यात आलेलं अपयश भारताच्या पराभवाचं निमित्त ठरलं. त्यामुळे आता भारताच्या पुरुष संघाला हॉकीच्या कांस्य पदकावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. कांस्यपदकाच्या या लढतीत भारताचा मुकाबला पाकिस्तान-जपानमधल्या पराभूत संघाशी होईल.