IND vs PAK Match : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळं आशिया कप 2022 स्पर्धेत भारताने (Asia Cup 2022) गुणतालिकेतही आघाडी घेतली आहे. दरम्यान पाकिस्तान संघाने हा सामना अगदी थोडक्यात गमावला. भारताने निर्धारीत लक्ष 19.4 ओव्हरमध्ये म्हणजे केवळ 2 बॉल शिल्लक असताना पूर्ण केलं. त्यामुळे अगदी थोडक्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. तर पाकिस्तान संघाच्या नेमक्या चूका कुठे झाल्या ते पाहूया...
- सर्वात आधी म्हणजे पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी त्यांचा मोहम्मद रिझवान सोडता कोणालाही खास कामगिरी करता आली नाही. त्यात अधिक फलंदाज हे बाऊन्सवर झेलबाद झाले, सुरुवातीचे फलंदाज बाद होत असताना पुढील फलंदाजांनी तिच चूक करणं अपेक्षित नव्हतं. पण असं न होता, फलंदाजांनी सुमार प्रदर्शन कायम ठेवलं.
- गोलंदाजीमध्ये तर पाकिस्तानने केवळ 148 धावांचं आव्हान असतानाही सामना अखेरपर्यंत नेला. त्यांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. पण अखेरच्या काही षचकांत कर्णधार बाबरला गोलंदाजी हवी तशी फिरवता आली नाही आणि योग्यप्रकारे गोलंदाजी न झाल्याने धावा येत गेल्या.
- पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणावेळी झालेली आणखी एक चूक म्हणजे संघाने अतिशय खराब क्षेत्ररक्षण केलं. बऱ्याच सोप्या-सोप्या धावा पाकिस्तानच्या खेळाडूंनी सोडल्या आणि भारताची धावसंख्या वाढली.यावेळी खराब क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तान संघाने विराट कोहलीचे बरेच झेल सोडले.
- कर्णधार बाबार आझमकडूनही काही चूका झाल्या. यावेळी युवा गोलंदाज नसीमने उत्तम गोलंदाजी केली. पण 18 व्या षटकात त्याच्या पायाला दुखापत झाली असतानाही अखेरचे 4 बॉल त्याच्याकडून टाकून घेतले. यावेळी बाबरने त्याला थांबवायला हवं होतं. विकेट नसती मिळाली तरी धावा नक्कीच वाचल्या असत्या.
- याशिवाय बाबरची आणखी एक चूक म्हणजे टी20 फॉर्मेटमध्ये अखेरच्या 3 ते 4 ओव्हरमधील कोणतीही ओव्हर फिरकीपटूला देणं म्हणजे धोक्याचं असतं आणि बाबरनं शेवटची ओव्हर मोहम्मद नवाज या फिरकीपटूला दिली. जे सामना गमावण्यास मोठं कारण ठरलं.
हे देखील वाचा-