PAK vs SL, Asia Cup Final: पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा (Pakistan vs Sri Lanka) संघ डगमताना दिसला. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेनं (Bhanuka Rajapaksa) एकाकी झुंज दिली. भानुका राजपक्षेच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफ सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.


नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आलं. श्रीलंकेच्या संघानं पॉवर प्लेच्या आत तीन विकेट्स गमावले. श्रीलंकेचा निम्मा संघ 10 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. कुसल मेंडिस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. निसांका आणि सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 17 धावांची 21 धावांची भागीदारी केली. पण निसांका 11 चेंडूत 8 धावा करून माघारी परतला.दानुष्का गुणथिलकलाही (4 चेंडू 1 धाव) या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. यानंतर धनंजय डी सिल्वाही ( 21 चेंडू 28 धावा) स्वस्तात माघारी परतला. कर्णधार दासुन शनाकाही अवघ्या दोन धावांवर असताना बाद झाला. 


हसरंगा आणि राजपक्षेनं संघाचा डाव सावरला
हसरंगा आणि राजपक्षे यांनी पाचव्या विकेटसाठी 36 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली. हसरंगा 21 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. पण भानुका राजपक्षेनं संघाची एक बाजू संभाळून ठेवली. त्यानं चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूत 54 धावांची भागीदारी करत श्रीलंकेची धावसंख्या 170 धावांपर्यंत पोहचवली. भानुकानं नाबाद 71 धावांची खेळी केली. ज्यात  6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. चमिकानं 14 चेंडूत 14 धावा केल्या. श्रीलंकेच्या संघानं अखेरच्या 5 षटकात 53 धावा कुटल्या. पाकिस्तानकडून हरीस रौफनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाह, शादाब खान आणि इफ्तिखर अहमद यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


संघ-


श्रीलंका प्लेइंग इलेव्हन:
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकिपर), दनुष्का गुनाथिलका, धनंजया डी सिल्वा, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, महेश थेक्षाना, दिलशान मदुशन


पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन:
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, शादाब खान, आसिफ अली, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन


हे देखील वाचा-


PAK vs SL: शादाब खान, नसीम शाहची पाकिस्तानच्या संघात एन्ट्री; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन


PAK vs SL, Asia Cup 2022 Final LIVE: श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर