IND vs SL, Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत- श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आज जोरदार टक्कर पाहायला मिळेल. आशिया चषकाच्या या हंगामातील भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा पहिला सामना असेल. दरम्यान, श्रीलंकेनं सुपर 4 मधील पहिला सामना जिंकलाय आणि भारताला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. दुसरीकडं श्रीलंकेचा संघ सुपर 4 फेरीतील दुसरा विजय मिळवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल.


भारतासाठी आजचा सामना अतिशिय महत्वाचा
भारतासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असेल. या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे. श्रीलंकाविरुद्ध पराभव झाल्यास भारताला अंतिम फेरी गाठणं अवघड होईल. भारत अशा परिस्थितीत आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.   दुसरीकडे, श्रीलंकानं सुपर 4 फेरीतील त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तसेच श्रीलंकेनं भारताविरुद्ध सामना जिंकल्यास त्यांचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल.


भारत आणि श्रीलंका सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना मंगळवारी 6 सप्टेंबर दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील लाईव्ह सामना कुठं आणि कसं पाहू शकतात?
भारत आणि श्रीलंका यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.


संघ-


भारतीय संघ:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल , आवेश खान.


श्रीलंकेचा संघ: 
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकिपर), चरित असलंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशांका, डी सिल्क चंदन, डी. जेफ्री वेंडरसे, अशेन बंदारा, प्रवीण जयविक्रमा, नुवानिडू फर्नांडो, प्रमोद मदुशन, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना.


हे देखील वाचा-