India vs Pakistan Asia Cup 2022 : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सुपर-4 फेरीतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संघात काही बदल करण्यात आले. दिनेश कार्तिक, आवेश खान यांना आराम देण्यात आला आहे. तर दुखापतग्रस्त जाडेजाच्या जागी हार्दिक पांड्याचं पुनरागमन झालेय. 

अनुभवी दिनेश कार्तिकला संघाबाहेर ठेवल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. दिनेश कार्तिकच्या चाहत्यांनी यासाठी ऋषभ पंत आणि दीपक हुड्डाला जबाबदार धरलं असून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. 

पाकिस्तानविरोधात भारतीय संघात दीपक हुड्डा आणि रवि बिश्नोई यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देम्यात आले आहे. हार्दिक पांड्याचं पुनरागमन झालेय. पण अनुभवी दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळालं नाही. कार्तिकला संघात स्थान न मिळाल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही जणांनी त्यासाठी ऋषभ पंतला जबाबदार धरले असून ट्रोल केलेय.  

 

दोन्ही संघाची प्लेईंग एलेव्हन-

भारत :केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.

पाकिस्तान :मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह. 

भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्डभारत आणि पाकिस्तान यांच्यातील जवळपास सर्वच सामने रोमहर्षक ठरलेत. परंतु, दोन्ही दोन्ही संघ आशिया चषक आणि आयसीसी एव्हेंटमध्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध खेळतात.दरम्यान, आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 16 वेळा आमने सामने आले आहेत. यातील 9 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, पाकिस्तानला पाच सामने जिंकता आली आहेत. यातील दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. आशिया चषकातील आकडेवारी पाहता भारताचं पारडं जडं दिसतंय.