Asia Cup 2025 अबुधाबी : आशिया कपच्या पहिल्या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं हाँगकाँगवर विजय मिळवला आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 188 धावा केल्या होत्या. एस. अटल याची नाबाद अर्धशतकी खेळी आणि आझमतुल्लाह ओमरझाईच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्ताननं 20 ओव्हरमध्ये 6 बाद 188 धावा केल्या. हाँगकाँगचे फलंदाज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांपुढं टिकाव धरु शकले नाहीत. त्यांचा संघ 20 ओव्हरमध्ये 9 बाद 94 धावा करु शकला. अफगाणिस्ताननं 94 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत खातं उघडलं आहे.
अफगाणिस्तानची विजयी सलामी Afghanistan Win against Hong Kong
अफगाणिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 26 धावांवर पर्यंत त्यांनी दोन विकेट गमावल्या होत्या. एस. अटल आणि मोहम्मद नबी यांनी 51 धावांची भागादारी केली. 95 धावांपर्यंत त्यांनी 4 विकेट गमावल्या. 13 ओव्हरपर्यंत अफगाणिस्ताननं 95 धावा केल्या होत्या. पुढच्या 7 ओव्हरमध्ये त्यांनी 93 धावा केल्या. आझमतुल्लाह ओमरझाई यानं 20 बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्यानं 21 बॉलमध्ये 53 धावा केल्या. ज्यामध्ये 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
आझमतुल्लाह ओमरझाईच्या आक्रमक फलंदाजीमुळं अफगाणिस्ताननं शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 69 धावा केल्या. अतिक इक्बालच्या एका ओव्हरमध्ये अफगाणिस्ताननं 25 धावा केल्या. 19 व्या ओव्हरमध्ये आयुष शुक्लानं 3 षटकार आणि एका चौकारासह 24 धावा दिल्या.
हाँगकाँगनं अफगाणिस्तानचे 5 कॅच सोडले, त पकडले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं.
188 धावांचा पाठलाग करणाऱ्या हाँगकाँगची सुरुवात खराब झाली. हाँगकाँगची पहिली विकेट 1 रन झालेली असताना गेली. त्यानंतर 12 धावसंख्येवर अफगाणिस्तानला हाँगकाँगची दुसरी विकेट मिळाली. हाँगकाँगनं नियमित अंतरानं विकेट गमावल्या. तिसरी विकेट 13 धावांवर तर चौथी विकेट 22 धावांवर गमावली. पुढं नियमित अंतरानं हाँगकाँगनं विकेट गमावल्या. अफगाणिस्तानच्या के जनत आणि घझन्फर वगळता इतरांना विकेट मिळाल्या. फजलहक फारुकी जी. नैब यानं हाँगकाँगच्या दोन विकेट घेतल्या. हाँगकाँगसाठी सर्वाधिक धावा बी. हयात यानं केल्या. त्यानं 39 धावा केल्या. तर, वाय. मुर्तझानं 16 धावा केल्या.
दरम्यान ब गटात अफगाणिस्ताननं विजयानं सुरुवात केली आहे. 10 सप्टेंबरला अ गटातील भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात लढत होणार आहे.
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग : अफगाणिस्तान विजय10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान 15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी221 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2 23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी124 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी225 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी226 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी128 सप्टेंबर – अंतिम सामना