Yuzvendra Chahal Team India : आशिया चषकासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. काही खेळाडूंचं कमबॅक झाले तर काहींना संधीच मिळाली नाही. भारताचा दिग्गज फिरकीपटू युजवेंद्र चहल याला आशिया चषकासाठी टीम इंडियात स्थान मिळाले नाही. चहलची निवड न झाल्यामुनळे अनेक दिग्गजांनी निवड समितीवर टीका केली. युजवेंद्र चहल टीम इंडियासाठी अनेकदा मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे. आयसीसीच्या स्पर्धेत तो दमदार कामगिरी करतो, तरीही त्याची निवड झाली नाही. त्यावरुन भारतीय संघावर टीका होत आहे. माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतामध्ये चहलसारखा चांगला गोलंदाज नाही, तरिही त्याला निवडले नाही, असे म्हणत भज्जीने आपला राग व्यक्त केला. 

चहलचे कौतुक करत हरभजन सिंह म्हणाला की, मला वाटते की, या संघात एक सर्वात मोठी कमतरता दिसत आहे, ती चहलचे नसणे आहे. एक लेग स्पिनर चेंडूला दुसरीकडे वळवू शकतो.  परफेक्ट फिरकी गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मला वाटते की मर्यादित षटकांसाठी चहल हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याचा सध्याचा फॉर्म चांगला नसला तरी तो चांगली गोलंदाजी करतो. चहल मॅच विनर खेळाडू आहे. तो फॉर्मात नसेल तर ब्रेक देणे हा योग्य निर्णय आहे. पण चहल संघात असता तर आत्मविश्वास कायम राहिला असता. कोणताही खेळाडू संघातून बाहेर पडला की त्याचे कमबॅक कठीण असते.  

चहल विश्वचषकाच्या संघात असणे गरजेचे आहे. मी अशी आशा करतो की, त्याच्यासाठी विश्वचषकाचे दरवाजे बंद झाले नसतील. कारण, स्पर्धा भारतात होणार आहे. चहल सिद्ध करून बसला आहे की, तो किती मोठा मॅचविनर आहे, असे भज्जी म्हणाला. 

चहलचे वनडे करिअर -
चहलने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळलाय. तर शेवटचा वनडे सामना जानेवारी २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला गेला होता. चहलला आशिया कपसाठी टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. त्याने 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट घेतल्या आहेत. तर त्याने 80 टी-20 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. दोन्ही फॉरमॅटमध्ये चहलचा रेकॉर्ड चांगला आहे.

30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

तारीख फेरी सामना ठिकाण कधी होणार सामना
30 ऑगस्ट 2023 1 पाकिस्तान vs नेपाळ मुल्तान, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
31 ऑगस्ट 2023 1 बांगलादेश vs श्रीलंका कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
2 सप्टेंबर 2023 1 पाकिस्तान vs भारत कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
3 सप्टेंबर 2023 1 बांगलादेश vs अफगाणिस्तान  लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
4 सप्टेंबर 2023 1 भारत vs नेपाळ  कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
5 सप्टेंबर 2023 1 श्रीलंका vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
6 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs B2 लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) B1 vs B2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs A2 कँडी, श्रीलंका दुपारी 3 वाजता
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs B1  दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका दुपारी 3 वाजता
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता