कानपूर कसोटीत अश्विनला सुवर्ण संधी
अश्विने वेस्ट इंडिज दौऱ्यात गोलंदाजीसोबतच उत्कृष्ट फलंदाजी करुन साऱ्यांचे लक्ष वेधले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअश्विनचा कानपूरमधील सामना हा त्याच्या कारकीर्दीतील 37वा सामना आहे. त्याने या सामन्यात सात विकेट घेऊन 200चा टप्पा पूर्ण केल्यास, कसोटी क्रिकेटमध्ये कमी सामन्यात हा टप्पा गाठणारा तो दुसरा खेळाडू ठरेल. या आधी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू क्लॅरी ग्रिमेट यांनी हा विक्रम केला होता.
तसेच अश्विन या मालिकेमध्ये अव्वल स्थान गाठण्यासोबतच 200 विकेट घेण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल. सध्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 193 विकेट घेतले आहेत.
अश्विन सध्या आयसीसी रॅकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. या क्रमवारीत अश्विन दक्षिण अफ्रिकेच्या डेल स्टेनपासून 19 तर इंग्लंडच्या जेम्स अॅडरसनपासून मात्र 11 अंकांनी पिछाडीवर आहे.
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये गुरुवारपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे, गुरुवारपासून सुरु होणारा कसोटी सामना हा भारतीय संघाचा 500 वा सामना आहे. या मालिकेदरम्यान आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची अव्वल स्थान गाठण्याची मनिषा असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -