कानपूर: टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचं भारतीय कर्णधार विराट कोहलीनं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 'भारताचा हा ऑफ स्पिनर 'अनमोल' आहे. ज्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत बरंच योगदान दिलं आहे.'
अश्विननं या सामन्यात 10 बळी मिळवले असून पहिल्या डावात महत्वपूर्ण 40 धावांची महत्वपूर्ण खेळीही केली.
भारतानं किवींवर मिळविलेल्या मोठ्या विजयानंतर कोहली म्हणाला की, "तो भारतय संघासाठी फारच महत्वाचा आहे. जगातील प्रभावशाली खेळाडूंबद्दल जर बोलायचं झालं तर त्याचा नक्कीच पहिल्या पाचात नंबर लागेल. फारच कमी खेळाडू असतात जे आपल्या संघावर आपला प्रभाव पाडत असतात. खासकरुन गोलंदाज. मला वाटतं गोलंदाज ते आहेत जे तुम्हाला कसोटी जिंकून देतात आणि अश्विन त्याच्यापैकी एक आहे."
इतकंच नव्हे तर विराट त्याचं यापुढे जाऊनही कौतुक केलं. 'तो एक स्मार्ट क्रिकेटर आहे. तेवढाच बुद्धीमानदेखील. ते त्याच्या फलंदाजीमध्येही दिसून येतं. त्यामुळेच त्याच्यासारखा क्रिकेटर तुमच्या संघात असणं ही 'अनमोल' गोष्ट आहे.