नवी दिल्लीः अँटिगा कसोटीत भारतीय विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रवीचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. याआधी 2015 या वर्षाच्या अखेरीस अश्विननं कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं.

 

 

टीम इंडिया त्यानंतर एकाही कसोटी सामन्यात खेळली नव्हती. त्यामुळं अश्विनला कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीतलं अव्वल स्थान गमवावं लागलं होतं. पण विंडीज दौऱ्यातल्या पहिल्याच कसोटीनंतर अश्विनने कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

 

 

अश्विनने या कसोटीच्या दुसऱ्या डावात 83 धावांत सात विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली. पण त्याआधी भारताच्या डावात अश्विनने 113 धावांची खेळीही उभारली. या कामगिरीने अष्टपैलू खेळाडूंच्या आयसीसी क्रमवारीत त्याचं अव्वल स्थान आणखी भक्कम झालं आहे.