50,000 रुपयात धर्मांतर, झाकीर नाईकच्या संस्थेवर आरोप
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 11:36 AM (IST)
नवी दिल्ली: झाकीर नाईकवर धर्मांतराच्या प्रकरणातील रोज नवे खुलासे होत आहेत. आता एका नव्या खुलाशानुसार, झाकीर नाईकच्या संस्थेकडून धर्मांतरासाठी 50,000 दिले जात असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, झाकीर नाईक संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन देशातील धर्मांतराची मोहीम राबवणारे एक केंद्र म्हणून उद्याला येत होते. सध्या झाकीर नाईकच्या संस्थेने जवळपास 800 नागरिकांचे धर्मांतर घडवून आणल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. झाकीर नाईकचा सहकारी आर्शी कुरेशी आणि रिझवान खान हे दोघे धर्मांतराची मोहीम राबवत असल्याचा आरोप होत आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झाकीरच्या भाषणाने प्रभावित होऊन अनेकजण झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनशी संपर्क करत होते. त्यावेळी कुरेशी हा त्यांना मुंबईत बोलावत असे, तर रिझवान त्यांना पनवेलला उतरवून त्यांची राहण्याची आणि धर्मांतराची सर्व प्रक्रिया पूर्ण करीत असे. याबद्ल्यात रिझवान झाकीर नाईकच्या संस्थेकडून पैसे घेत असल्याचे समोर येत आहे. या कामासाठी झाकीर नाईकच्या संस्थेला सौदी अरेबियाकडून फंडिंग होत असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे हे धर्मांतर केलेल्या नागरिकांचे पुढे काय होत होते, याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. संबंधित बातम्या