मुंबई: टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा, आज न्यूझीलंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.


नवी दिल्लीचं फिरोजशहा कोटला स्टेडियम हे नेहराचं माहेरघर आहे. त्यामुळं दिल्लीतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात खेळून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करण्याची संधी आहे.

नेहरा म्हणतो ते 2 खेळाडू सर्वात चलाख, एक म्हणजे धोनी, दुसरा...

38 वर्षांच्या नेहरानं आजवर 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. नेहराच्या 18 वर्षांच्या कारकीर्दीला वारंवार दुखापतींचं ग्रहण लागलेलं पाहायला मिळालं. त्यामुळं या 18 वर्षात त्याला बारा शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं आहे.


संधी मिळाली तर तो क्षण बदलेन

क्रिकेट कारकिर्दीबद्दल आठवण सांगताना नेहरा म्हणाला, “माझी 20 वर्षीय कारकीर्द रोमांचक राहिली. मी भावूक नाही. त्यामुळे माझी पुढची 20 वर्ष कशी असतील, याची मी वाट पाहतोय. माझे ती 20 वर्षही मागील 20 वर्षाप्रमाणेच असतील. मी 1997 मध्ये दिल्लीकडून खेळण्यास सुरुवात केली. टीम इंडियाने जिंकलेल्या विश्वविजयी संघात माझा समावेश होता. मात्र माझ्या मनात एकच खंत आहे, ती म्हणजे 2003 च्या विश्वचषकाच्या फायनलची.

जर मला 20 वर्षांच्या कारकिर्दीत काय बदलायचं असेल, तर मी जोहान्सबर्गमध्ये 2003 मध्ये झालेल्या विश्वचषकाची फायनल बदलेन. मात्र आता ते शक्य नाही, सर्व काही नशिबाचा भाग आहे”.

वर्ल्डकप 2003 ची फायनल

2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाने विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत रंगली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 359 धावा केल्या होत्या. मात्र भारताचा डाव 234 धावातच आटोपला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना तब्बल 125 धावांनी जिंकून विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

यावेळी भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि आशिष नेहरावर होती. मात्र या तिघांनाही एकही विकेट घेता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या ज्या दोन विकेट गेल्या होत्या त्या एकटा हरभजन सिंहने घेतल्या होत्या.

संबंधित बातम्या

नेहरा म्हणतो ते 2 खेळाडू सर्वात चलाख, एक म्हणजे धोनी, दुसरा...

19 वर्षात 12 शस्त्रक्रिया, तरीही नेहरा खेळत राहिला! 


नेहराच्या जिद्दीला सलाम ठोकायचा तर आजच्या सामन्यात विजय हवाच!