लंडन : केनिंग्टन ओव्हलवरच्या पाचव्या आणि अखेरच्या अॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात करुन मालिका 2-2 अशी बरोबरीत राखली. मात्र गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडेच अॅशेसचा मान कायम राहिला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीचच्या भेदक आक्रमणामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 263 धावांत आटोपला. ब्रॉड आणि लीचने प्रत्येकी चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर ज्यो रुटने दोन विकेट्स घेतल्या. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडमध्ये 18 वर्षांनंतर अॅशेस मालिका जिंकण्याचं स्वप्नं अधुरं राहिलं.


इंग्लंड - 294 (पहिला डाव) आणि 329 (दुसरा डाव)
ऑस्ट्रेलिया - 225 (पहिला डाव) आणि 263 (दुसरा डाव)


वेडची शतकी खेळी व्यर्थ


399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने झुंजार शतकी खेळी साकारली. त्याने 166 चेंड़ूत 17 चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी उभारली. पण ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. वेडचे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं.


https://twitter.com/ICC/status/1173310529978417154

47 वर्षांनंतर अॅशेस मालिका अनिर्णित

1972 नंतर अॅशेस मालिका अनिर्णित राहण्याची ही पहिलीच वेळ ठरली. याआधी 1972 साली इंग्लंडमध्येच खेळवण्यात आलेली मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. अॅशेसच्या आजवरच्या इतिहासात केवळ सहाच मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत.


अनिर्णित अॅशेस मालिका


1938 - 1-1
1962/63 - 1-1
1965/66 - 1-1
1968 - 1-1
1972 - 2-2
2019 - 2-2


स्टीव्ह स्मिथला मालिकावीराचा बहुमान


यंदाच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने धावांचा अक्षरश: रतीब घातला. बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे झालेली बंदीची शिक्षा संपल्यानंतर स्मिथनं कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केलं. त्यानं या मालिकेत चार कसोटीत 774 धावांचा रतीब घातला.

स्मिथची यंदाच्या अॅशेस मालिकेतली कामगिरी


सामने - 4
डाव - 7
धावा - 774
सरासरी - 110.57
शतकं - 3
अर्धशतकं - 3


या कामगिरीमुळे स्मिथला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.


यंदाच्या अॅशेस कसोटींचे निकाल

पहिली कसोटी (बर्मिंगहॅम) - ऑस्ट्रेलिया 251 धावांनी विजयी


दुसरी कसोटी (लीड्स) - अनिर्णित


तिसरी कसोटी (लॉर्डस) - इंग्लंड एका विकेटने विजयी


चौथी कसोटी (मॅन्चेस्टर) - ऑस्ट्रेलियाची 185 धावांनी सरशी


पाचवी कसोटी (केनिंग्टन ओव्हल) - इंग्लंड 135 धावांनी विजयी