आयपीएल लिलाव : 800 अब्जांच्या मालकाच्या मुलावर 30 लाखांची बोली
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2018 09:11 AM (IST)
अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात आली. तर काही खेळाडूंना बेस प्राईसवरच खरेदी करण्यात आलं.
बंगळुरु : आयपीएल लिलावात संघांच्या मालकांनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात आली. तर काही खेळाडूंना बेस प्राईसवरच खरेदी करण्यात आलं. आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी एक असा खेळाडू होता, ज्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं. मात्र त्याच्या संपत्ती किती हे तुम्ही ऐकलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक कुमार मंगलम बिर्लांचा मुलगा आर्यमान विक्रम बिर्ला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची सध्याची संपत्ती 800 अब्ज रुपये आहे. आयपीएल लिलावात आर्यमानसाठी राजस्थान रॉयल्सने बोली लावत त्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. त्याची बेस प्राईस 20 लाख रुपये होती. 20 वर्षी आर्यमान फलंदाज असून त्याने आतापर्यंत केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळलेला आहे. संबंधित बातम्या :