लंडन : महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि भारताचा महिला संघ एकमेकांशी या महामुकाबल्यात भिडणार आहे. पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवण्यासाठी कर्णधार मिताली राजच्या संघाने कंबर कसली आहे.
या महत्वाच्या सामन्यापूर्वी सर्वच खेळाडू नेट्सवर कसून सराव करत आहेत. यातच ऑस्ट्रेलियन पत्रकार मेलिंडा फेरिलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर भारतीय फलंदाज वेदा कृष्णमुर्तीला गोलंदाजी करत आहे.
https://twitter.com/melindafarrell/status/888702125903052800
नेट्समध्ये अनेक गोलंदाज फलंदाजांकडून सराव करुन घेतात. त्याचाच एक भाग म्हणून अर्जुननेही गोलंदाजी केली. अर्जुन एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो.
भारतीय महिला संघाने सहा वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये 36 धावांनी धूळ चारली होती. या विजयाने मनोबल वाढलेला भारतीय संघ विश्वविजेता होण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
फायनलपूर्वी अर्जुनच्या गोलंदाजीवर महिला फलंदाजाचा सराव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2017 12:43 PM (IST)
ऑस्ट्रेलियन पत्रकार मेलिंडा फेरिलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर भारतीय फलंदाज वेदा कृष्णमुर्तीला गोलंदाजी करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -